काजू उत्पादनात घट होण्याची भीती
बेळगाव प्रतिनिधी:
चालू वर्षी खराब हवामानामुळे काजूगर उत्पादनामध्ये घट होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरी पडलेल्या धुकटीमुळे काजू झाडाचा मोहर बाद झाला होता. त्यामुळे काजूगराच्या उत्पादनामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर घट होण्याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी वर्गाला अशा खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे.
बेळगाव तालुक्यात खासकरून पश्चिम विभागामध्ये काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचबरोबर तालुक्याच्या काही भागांमध्ये देखील काजूची झाडे आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक चांगला स्तोत्र म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. मात्र मध्यंतरी पडलेल्या धुकटीमुळे मोहर जळून गेला आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये चांगली घट होणार अशी चर्चा शेतकऱ्यातून करण्यात येत आहे.
साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या काजूगराचे उत्पन्न सुरू होते. काजू व्यापारी गावोगावी जाऊन या काजूची खरेदी करतात. पण शेतकऱ्याला मात्र त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामध्ये काटामारीचा प्रश्न येतो. वजनामध्ये तूट आणि योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. बेळगाव आणि परिसरामध्ये काजूगराला मोठी मागणी असते. पण मोठ्या प्रमाणावर खरेदी ही व्यापारी वर्गाकडूनच नागरिक करताना दिसतात. https://dmedia24.com/meeting-of-the-yelur-division-am-committee-on-monday/