कोबीज आणि अन्य भाज्यांच्या दरात कमालीची घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयच्या समोर कोबी फेकून आंदोलन छेडले.कोबीजचा ऐशी पैसे किलो इतका दर घसरल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.राज्य रयत संघ आणि हसीरू क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन छेडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले.https://dmedia24.com/cleanliness-and-punitive-action/
बेळगाव परिसरातील हजारो एकर शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कोबीज आणि अन्य भाज्यांची लागवड केली आहे. पण कोबीज दरात अचानक घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कोबीचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबीज शेतात सोडून दिली आहे. त्यामुळे कोबीज शेतात कुजून जात आहे.
१ एकर कोबीज लावण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले आहेत. याशिवाय शेतात राबणूक देखील केली आहे. असे असताना कोबीज भाजीचा भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोबीज शेतातून काढले नसल्याने शेतात भाजी कुजून जात आहे. https://youtu.be/0RYP1LMTc3U?si=sPcNZb1re8GOVyPH