**सीए वीरण्णा मल्लिकार्जुन मुरगोड यांची इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, बेळगांव शाखेच्या अध्यक्षपदी निवड**
बेळगांव: इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या बेळगांव शाखेच्या नव्या कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली आहे. सीए वीरण्णा मल्लिकार्जुन मुरगोड यांनी शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या निवडणुकीच्या वेळी माजी अध्यक्ष सीए राजेंद्र मुंदडा यांनी प्रमुख भाषण करून शाखेच्या मागील कार्यकाळातील यशस्वी उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी २०२४ मध्ये शाखेने साजरा केलेला सुवर्ण महोत्सव, जनजागृती कार्यक्रम आणि गुंतवणूकदारांसाठी आयोजित केलेल्या मोहिमांबद्दल माहिती सांगितली. त्यांनी आपल्या संपूर्ण टीमचे आणि शाखेतील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात इतर माजी समिती सदस्य सीए नितीन निंबाळकर आणि सीए एम.एस. तिगडी यांनीही आपल्या कार्यकाळातील अनुभवांवर प्रकाश टाकला आणि शाखेच्या वाढीबद्दल मनोगत व्यक्त केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष सीए वीरण्णा मल्लिकार्जुन मुरगोड यांनी आपल्या भाषणात २०२५-२०२६ या कालावधीसाठीच्या कृती आराखड्याची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी शाखेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याची घोषणा केली. त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारी समिती खालीलप्रमाणे आहे:
**अध्यक्ष**: सीए वीरण्णा एम. मुरगोड
**उपाध्यक्ष**: सीए संजीव आर. देशपांडे
**सचिव**: सीए सचिन एस. खडबडी
**कोषाध्यक्ष**: सीए रविंद्र एन. शांतागिरी
**SICASA (CA विद्यार्थी संघटना) बेळगावी**: सीए अनिल आय. रामदुर्ग
**ITT समन्वयक**: सीए प्रसाद एस. शोलापूरमठ
समितीच्या शपथविधीत वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीए विलास हळभवी यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. नव्या समितीने शाखेच्या विकासासाठी आणि सदस्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे संकल्प व्यक्त केले.कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न.
या निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी नव्या समितीला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. शाखेच्या भविष्यातील उपक्रमांबद्दल सदस्यांमध्ये मोठ्या आशा आहेत.