एकदा खेळाडूंना उद्देशून बोलताना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू म्हणाल्या होत्या, “संघर्ष जितका कठीण असेल तितकं यश गौरवशाली असते!” याचाच परिपाठ म्हणजे नुकत्याच पोनमपेट मैसूरू येथे संपन्न झालेल्या हाॅकी क्रीडास्पर्धा आणि त्यात आपली कौशल्य पणाला लावून ताराराणी हायस्कूलच्या हाॅकी खेळाडूंनी कौतुकास्पद व गौरवशाली केलेली कामगिरी आहे.
जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांची जोड खेळाला दिली तर यश नाही मिळवता आलं तरी आपली छाप त्या खेळावर सोडता येते हे बेळगाव जिल्ह्याचे निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या ताराराणी हायस्कूलच्या मुलींच्या संघाने दाखवून दिले व खानापूर तालुक्याला पहिल्यांदाच हाॅकी खेळातील ऐतिहासिक असे कांस्यपदक मिळवून दिले.
या विजयी संघाचे नेतृत्व कॅप्टन मयुरी कंग्राळकर हीने केले, या संघाचे बलस्थान म्हणजे तगडा गोलकीपर नेत्रा गुरव ही असून कुमारी साक्षी पाटील, राधिका पाटील, साक्षी चौगुले, सविता चिगदीनकोप, आयेशा शेख, प्रीती नांदुडकर, ममता कुंभार, सानिका पाटील, श्रेया पाटील, अनुराधा मयेकर, श्रेया गोंधळी, वैष्णवी ईटनाळ, सेजल भावी, तनुश्री गावडे, निशा दोडमनी, भूमी लटकन, वैष्णवी नाईक या संघ सदस्य आहेत.
या खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू व संचालक श्री शिवाजीराव पाटील, ज्येष्ठ संचालक परशराम गुरव शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन. जाधव यांचे सदैव प्रोत्साहन मिळत आहे.
तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी टी पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत असून, ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्यासह बेळगाव हॉकी फेडरेशन सेक्रेटरी श्री सुधाकर चाळके, कोच उत्तम शिंदे, संतोष दरेकर, गणपत गावडे, सदस्य नामदेव सावंत, मनोहर पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले असून क्रीडा शिक्षक श्री वाय एफ निलजकर, श्री सी के गोमानाचे, श्री यु एम धबाले श्रीमती एम एस तंगडे व सर्व शिक्षक वर्गाचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या घवघवीत यशासाठी खेळाडू विद्यार्थीनीना संचालक शिवाजी पाटील व मुख्याध्यापक श्री राहूल जाधव यांनी पेढे भरवून आणि अभिनंदन केले.