मराठी भाषा अन संस्कृती रक्षणासाठी सीमावासीय सज्ज
मुतग्यात आर एम चौगुले यांचे जल्लोषी स्वागत
सांबरा:दिवसेंदिवस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारातील रंगत वाढतच असून मराठी भाषा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिक सज्ज झाल्याच चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.मुतगे येथे काल झालेल्या प्रचारफेरी दरम्यान याची प्रचिती आली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ग्रामपंचायत अध्यक्ष किरण पाटील व इतरांच्या हस्ते करून प्रचारफेरीची सूरवात करण्यात आली.
ही प्रचारफेरी बस्ती गल्ली,बसवाण गल्ली, गांधी गल्ली,लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, शिवाजी गल्ली, मारूती गल्ली,चावडी गल्ली, आंबेडकर गल्ली, नेहरू गल्ली व इतर गल्ल्यांमधून फिरून वेंकटेश नगर येथे पोहोचली त्या ठिकाणी झालेल्या कोपरा सभेत आर एम चौगुले यांनी मतदारांना भावनिक साद घातली. यावेळी नारायण कणबरकर यांनी सुत्र संचालन केले.
त्यानंतर ही फेरी शिवाजीनगर परिसरातील प्रत्येक गल्लीत फिरून तेथेच सांगता करण्यात आली.संपूर्ण परिसर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दणाणून गेला
या फेरीत निवृत्त मुख्याध्यापक एन.डी.बंडाचे,पी. वाय. पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष किरण पाटील सदस्य सर्वश्री भालचंद्र पाटील, सुधीर पाटील, प्रभाकर पाटील,भारता पाटील,बबीता पाटील, भाग्यश्री पाटील मा. ता.पं. सदस्य सुनिल अष्टेकर, शामराव पाटील, मनोहर कडेमणी, महेश पाटील, किसन पाटील,राजू इंगळे,प्रमोद इंगळे, भाऊ जाधव,भावकाणा पाटील, गणपत पाटील, सचिन पाटील, शिरीष पाटील, प्रशांत कुरळे,एन डी पाटील,भैरुगावडा पाटील,बाळू अष्टेकर,अडत व्यापारी गंगाराम पाटील, सुरेश चौगुले, भाऊ चौगुले,भाऊसाहेब कणबरकर, गजानन कणबरकर, रणजित पाटील, सुनिल पाटील, नारायण बिरादार, प्रमोद पाटील, गजानन बंडाचे ,नारायण इंगळे,बाळू पाटील, किरण केदार यांच्यासह हजारों युवक,महिला आणि नागरिकांनी या फेरीत सहभाग नोंदवला.