बेळगाव: दिनांक ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी श्री दानम्मा देवी मंगल कार्यालयात ६ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या कराटे स्पर्धा बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये ब्लूमिंग बर्ड्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये बेळगाव मधील विविध शाळांमधून १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तर यामध्ये ब्लूमिंग बर्ड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ३ सुवर्णपदक २ रौप्य पदक आणि ३ कास्य पदक मिळवली. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे प्राप्ती हनुमान कदम,ऐश्वर्या लोहार,कृतिका तुझे,अभिमान सिंग,निवांत पवार,अरहान हजरते,दश कलबुर्गी,आयान केतन,आरुष इंगळे,आर्यन लाड अशी आहेत.
ब्लूमिंग बर्ड्स शाळेचे प्राचार्य सुषमा चरंतीमठ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी त्या बोलताना म्हणाले की आत्मरक्षण कलाही सर्व विद्यार्थ्यांना आली पाहिजे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनाही खूप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व विद्यार्थ्यांना सुषमा चरंतीमठ कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.