संख्या भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आज चिकोडी शहराबाहेरील उमराणी घाटानजीक घडली आहे. नंतर आरोपी भाऊ चिकोडी पोलिसांना शरण झाला आहे.
अकबर शेख ( वय 40) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमजद शेख ( वय 38) असे आरोपी भावाचे नाव आहे.
याबद्दल चिकोडी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अकबर शेख व अमजद शेख हे संख्ये भाऊ आहेत.
अकबर याचे कब्बूर येथे बॅटरीचे दुकान असून आज सायंकाळी 4 च्या दरम्यान कब्बूरहून चिकोडीकडे आपल्या दुचाकीने जात होता.
लहान भाऊ अमजद याने गाडीचा कारने पाठलाग करून मोठा भाऊ अकबरला अडवला.
यावेळी अमजदने धारदार शस्त्राने अकबर यांच्यावर हल्ला करून निर्घृणपणे खून केली.
त्यानंतर आरोपी अमजदने थेट चिकोडी पोलिस स्थानकात येऊन हजर झाला आहे.
या घटनेमुळे चिकोडी शहरात एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी चिकोडी सीपीआय आर आर पाटील, पीएसआय यमनापा मांग घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिकोडी सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इस्पितळ व चिकोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.
D Media 24 > Local News > अनैतिक संबंधतून खून
अनैतिक संबंधतून खून
D Media 2405/12/2022
posted on
Leave a reply