कर्नाटका स्टेट लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बेळगाव यांच्या वतीने शनिवारी 27 /7/ 2024 रोजी काकती येथील मोनिका मंगल कार्यालय मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिराचे उद्घाटन सी रमेश कर्नाटका स्टेट प्रेसिडेंट आणि बेळगावी जिल्हाध्यक्ष हरीश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन डिव्हाइन हेल्पिंग हँड्स तर्फे गजानन गव्हाणे व पवन माळदकर यांनी धो धो पाऊस व डेंगू, टायफॉईड मुळे बरेचसे रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे यामुळे या मानवतेच्या सेवेसाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराला के एल ई हॉस्पिटल चे डॉक्टर विरगे सर व बिम्स हॉस्पिटल चे डॉक्टर रवींद्र पाटील ब्लड बँक यांना आमंत्रित करण्यात आले होते शिबिरामध्ये शंभरच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले या सेवेमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर बेळगाव जिल्हा कमिटी व तालुका कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून या सेवेला चालना दिली