श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ, गुजरात भवन शास्त्रीनगर यांच्यावतीने रक्तदान शिबीर
शास्त्रीनगरमधील श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ, गुजरात भवनतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी गुजराती समाजातील व शास्त्रीनगरमधील कार्यकर्त्यांनी उत्साहाने रक्तदान ककेले. केएलई हाॕस्पिटलच्या रक्तपेढीमार्फत जवळपास 24 युनिट रक्त संकलित केले गेले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष रमेशभाई लद्दड, उपाध्यक्ष बिपीनचंद्र पटेल, सेक्रेटरी विजय भद्रा, खजिनदार पंकज शहा, ट्रस्टी भावेश चुडासमा, भूपेंद्र पटेल व इतर समाज बांधव उपस्थित होते.