रिंग रोड विरोधात झाडशापुर येथे रस्ता रोको
आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एल्गार पुकारला. यावेळी बेळगाव रिंग रोडचा प्रस्ताव आणून पाडण्याकरिता झाड शहापूर बेळगाव येथे बेळगाव खानापूर रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले आणि गावची सुपीक जमीन देणार नाही असे ठणकावून सांगितले.
https://fb.watch/iemQv3ZOny/
यावेळी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या पत्नीने देखील रस्त्यामध्ये ठाण मांडले होते. याप्रसंगी रिंग रोडच्या विरोधात शेतकऱ्यांनी विराट रास्ता रोको पाहायला मिळाला.
तसेच यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आणि शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा रिंग रोड चा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी देऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी महिलांनी हातात रिंग रोड विरोधी फलक धरून रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. सरकारचा धिक्कार असो शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जय जवान जय किसान यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी शेतकऱ्यांनी आमची ती पार सुपीक जमीन देणार नाही सुपीक जमीन रिंग रोड साठी नष्ट करणार नाही. तुम्ही रिंग रोड ऐवजी फ्लाय ओर ब्रिज बांधा मात्र आम्ही आमचे सुपीक जमीन देणार नाही असे ठणकावून सांगितले
यावेळी जवळपास 32 गावांमध्ये शेतकरी रिंग रोडला विरोध करण्याकरिता एकवटले होते तसेच त्यांनी रास्ता रोको करून आपली मागणी मान्य करावे अशी मागणी केली.
यावेळी या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडा देखील आणल्या होत्या तसेच अनेकांनी हातामध्ये या रिंग रोड फलक दाखवून या रिंग रोडला विरोध केला. यावेळी आंदोलनाच्या स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.