सफाई कर्मचाऱ्यांना माधुरी जाधव फाउंडेशनकडून ब्लॅंकेट वाटप — सामाजिक बांधिलकीचा आदर्श
बेळगाव :
शहर स्वच्छतेसाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेला मान देत समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) यांनी आपल्या मातोश्री श्रीमती वासंती रामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेटचे वितरण केले.
सध्या बेळगाव शहरात पावसाचे प्रमाण वाढल्याने गारठा व थंडीची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना कचरा संकलन आणि स्वच्छतेचे काम सतत पार पाडावे लागते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक जबाबदारी जपत जाधव फाउंडेशनकडून ही पुढाकार घेण्यात आला.
माधुरी जाधव पाटील यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल सफाई कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.