भाजप दहा दिवस विजय बूथ अभियान आणि विजय संकल्प अभियान
फेब्रुवारी महिन्यात दहा दिवस विजय बूथ अभियान आणि विजय संकल्प अभियान चालविणारा असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अभय पाटील यांनी दिली.
बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघात येत्या 2 फेब्रुवारी पासून दहा दिवस विजय बूथ अभियान आणि विजय संकल्प अभियानास प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभियानात घरोघरी भाजपचा ध्वज लावणार आहे शिवाय माझे घर भाजपचे घर अशा आशयाचे स्टिकर प्रत्येक घरावर आणि वाहनावर लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत आमदारांनी दिली.
त्यानंतर भाजप सत्तेत आल्यानंतर कोणकोणते विकास कामे योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत आणि त्याचा लाभ गरजूंना करून दिला आहे त्याची माहिती दिली.
यावेळी आमदारांनी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेचे उत्तरचे आमदार अनिल बेनके एम बी जिरली मुरगेंद्र गौडा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.