राज्यातील भाजप नेते फुललेल्या कमळावर करत आहेत पाणी शिंपडण्याचे काम
आज जिल्हा काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या प्रकार परिषदेत बोलताना यमकनमर्डीचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले की, भाजप राज्यात विविध कार्यक्रम घेऊन जनतेला पोकळ आश्वासने देत आहे. तसेच राज्यातील भाजप नेते फुललेल्या कमळावर पाणी शिंपडण्याचे काम करत आहेत, त्यांची सर्कस यशस्वी होणार नसल्याचे वक्त्यव्य यावेळी पत्रकार परिषदेत केले.
https://www.facebook.com/DMEDIA24/videos/551071983406689/?mibextid=8Amip7
त्यानंतर ते म्हणाले की महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज म्हैसूर पॅलेस मैदानावर “ना नायकी” अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. “हे प्रामुख्याने महिलांसाठी आहे,”ना, नायकी” संमेलनात प्रियांका गांधी येणार आहेत आणि महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहेत . काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच महिलांना अधिक महत्त्व दिले आहे. माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या काळात, आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काळात स्त्री शक्ती संघासह अनेक योजना राबवल्या आहेत .
तसेच महिलांना आरक्षण, हक्क, पेन्शन, अगदी सरकारकडून उपलब्ध असलेल्या साइट्स देण्यासाठी आम्ही कायदा आणला आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे मोठे नेतृत्व आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकजण कर्तृत्ववान आहे असे आम्हाला वाटते.असे ते याप्रसंगी म्हणाले
यापूर्वी भाजप सरकारने राज्यावर कर्जाचा बोजा टाकला होता. नंतर सिद्धरामय्या यांचे सरकार आल्यानंतर भाजपने केलेले कर्ज फेडण्याचे काम सुरू झाले आहे.
आम्हाला जिप्ट राजकारणाची गरज नाही : ग्रामीण भागात जिप्ट राजकारण सुरू आहे असे ते म्हणाले .
त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना तुम्ही तुमच्या मतदारसंघात असे राजकारण करत आहात का, असा प्रश्न केला त्यावेळी ते या पत्रकारांच्या प्रश्नालाउत्तर देताना म्हणाले की आमच्या मतदारसंघात अशा भेटींचे राजकारण करण्याची गरज नसल्याचे सांगितले.यावेळी केपीसीसी सचिव सुनिल हन्नामन, जिल्हा काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षा विनय नवलगट्टी उपस्थित होते.