| Latest Version 9.0.7 |

Local News

*किकेरी गावातील बिस्तादेवी केमेन्नावरची दिल्ली विमानतळावर निवड – स्कायवर्डकडून सन्मान*

*किकेरी गावातील बिस्तादेवी केमेन्नावरची दिल्ली विमानतळावर निवड – स्कायवर्डकडून सन्मान*

बेळगाव : किकेरीसारख्या ग्रामीण भागातून आलेली बिस्तादेवी केमेन्नावर हिने स्कायवर्डमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिला इन्कलम हॉस्पिटॅलिटी मार्फत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली येथे नियुक्ती मिळाली आहे.

या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी स्कायवर्डच्या गोंधळी गल्ली येथील कार्यालयात विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी स्कायवर्डचे सीईओ विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती बामणे तसेच स्कायवर्डचे मॅनेजर फैजल यांच्या हस्ते बिस्तादेवी तसेच तिच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करताना बिस्तादेवी म्हणाली, “मी कन्नड माध्यमातून शिक्षण घेतले असून, स्कायवर्डमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझ्या इंग्रजी बोलण्याच्या कौशल्यामध्ये सुधारणा झाली. योग्य मार्गदर्शनामुळेच आज मला हे यश मिळाले आहे.”

तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.


Deepak Sutar
the authorDeepak Sutar
WhatsApp

Don’t Miss Out! Join Our WhatsApp Group Today!

Get the latest news, updates, and exclusive content delivered straight to your WhatsApp.

Powered By KhushiHost

";