पक्षी- प्राण्यांना उन्हाची झळ
बेळगाव:
चालू वर्षी उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे. प्रखर उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मानवाबरोबरच प्राणी आणि पक्षांना देखील उन्हाची तीव्रतेने झळ जाणवत आहे.असह्य होणाऱ्या उन्हापासून थोडासा थंडावा मिळावा यासाठी पक्षी आणि प्राणी देखील सार्वजनिक नळावर तसेच तलावांवर पाणी पिऊन आपली तहान भागवताना चे चित्र दिसून येत आहे.https://dmedia24.com/international-wrestling-ground-in-yellur-on-thursday/
काही दिवसापूर्वी एक कावळा सार्वजनिक नळावर पाणी पिताना चे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे एका वानराला पाणी पिण्याची तहान लागली होती. पण त्याला पाणी मिळत नव्हते. त्यावेळी एका मानवाने हे पाहून त्या वानराला पाणी पाजले. पाणी पिल्यानंतर त्या वानराला थोडेसे हायसे वाटले. एकूणच या कडक उन्हाळ्यामुळे प्राणी आणि पक्षांना देखील चांगलीच झळ जाणवत आहे.
हे समजताच काही पशु आणि पक्षी प्रेमींनी प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठी काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे.