*जैवविविधतासंवर्धन व मानवी अस्तित्व टिकवणे गरजेचे : प्राचार्य डॉ एस. एन. पाटील*
*द.म.शि.मंडळ, बी.के/ज्योती कॉलेज, वायसीएमयू, माजी विद्यार्थी संघटना, ज्योती करिअर अकॅडमीतर्फे जागतिक वनमहोत्सव दिन आणि झाडे लावा झाडे जगवा उपक्रम*
बेळगाव , तारीख ( 07 जून 2023 ) : जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवा प्रदूषण आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. सजीव, निर्जीव म्हणजेच हवा, पाणी,झाडेझुडपे या सर्वांचे मिळून पर्यावरण बनते. यास्तव पृथ्वीचे देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे. निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पुढे जाऊन ती लोकचळवळ झाली, तर ते सर्व घटकांच्या दृष्टीने अधिक लाभदायक ठरेल, हे निश्चित.पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे असे प्रतिपादन भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव आणि भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, माजी विद्यार्थी संघटना बेळगाव, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय बेळगाव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बेळगांव – चंदगड कोल्हापूर शाखा , बीबीए व बीसीए महाविद्यालययांच्या संयुक्त विद्यमाने *जागतिक वनमहोत्सव दिन आणि झाडे लावा झाडे जगवा* असा संयुक्त कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तो रोकण्याकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दिनांक 5 जून सकाळी 2023 रोजी भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आयएएस उत्तीर्ण झालेल्या श्रुती यरगट्टी, निवृत्त प्राचार्य डॉ डीएन मिसाळे, अध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील सचिव प्रा. विक्रम एल पाटील, प्रा. निलेश शिंदे, प्रा अमित सुब्रमण्यम, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. डॉ. डी. टी. पाटील, प्राचार्य डॉ आर डी शेलार प्राचार्य आनंद पाटील प्राचार्य डॉ. बसवराज कोळूचे व्यासपीठावर उपस्थित होते; मान्यवरांच्या हस्ते विविध झाडे लावण्यात आली.महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विविध झाडे लावून त्यांना पाणी घालण्यात आले. झाडांचे महत्त्व पटवून त्याची संवर्धन कसे होईल याची माहिती देण्यात आली.
स्वागत प्रा. डॉ. एम. एस. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शुभम चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप वाडेकर व सुनिल ताटे यांनी केले. आभार प्रा. महादेव नार्वेकर यांनी मानले.
यावेळी प्रा. अमित चिंगळी, प्रा. नारायण तोराळकर, प्रा सुरज पाटील, प्रा. बी. आय. वसुलकर, प्रा. निता पाटील, प्रा. अनिता पाटील, राजाराम हलगेकर, प्रा. व्ही. वाय पाटील मंडळाचे
पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी कर्मचारी आणि समाजातील नामवंत मान्यवर मंडळी उपस्थित होते.