महिलेवर मोठा अन्याय : पोलिसांकडून प्रकरणावर पडदा
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मतदारसंघातील एका महिलेवर मोठा अन्याय झाला आहे.मात्र या अन्यायाला वाचा फोडण्या ऐवजी पोलिसांनी या प्रकरणावर पडदा घातला असल्याची बाब समोर आली आहे.
एक महिला बरोबर बलात्कार होऊन ती गर्भवती झाली त्यानंतर प्रसूती होऊन देखील पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. मात्र आपल्याला न्याय मिळावा याकरिता सदर महिला ही झगडत आहे.
याबाबत माहिती अशी की कडोली गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिलेचा पती कोरोनांनी दगावला. त्यामुळे त्या महिलेचे जीवन जगणे कठीण झाले त्यानंतर तिने जन्मलेल्या दोन मुलांना पाठीवर घेऊन त्याच गावात विष्णू पाटलाने सुरू केलेला कोंबडी फार्ममध्ये मुलांचे पोट भरण्यासाठी आणि त्यांचे भविष्य घडविण्यासाठी काम केले.
त्यानंतर तिच्या एकटेपणा चा फायदा घेत शाहूनगर येथील प्रवीण कागणगीरकर वय 30 वर्षे या तरुणांने तिच्या सोबत प्रेमाचे नाटक केले.
त्यानंतर तो आपल्याशी लग्न करेल आणि आपल्या मुलांचे भविष्य घडवेल या स्वप्नात राहत होते मात्र काही महिन्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर तिने याबाबत त्याला माहिती दिली.
यावेळी त्या युवकाने त्या मुलाला मारून टाक आणि त्यानंतर मग लग्न करू असे सांगितले त्यानंतर सदर कोंबडी फार्म मालक त्या मुलाला समजवण्याऐवजी गर्भपात करण्याचा आग्रह केला त्यानंतर दुसरा कोणताही पर्याय समोर नसल्याने तिने काकती पोलीस ठाणे गाठले मात्र या ठिकाणीही प्रकरणावर पडदा घालण्यात आला. आता सध्या ही महिला आपल्याला न्याय मिळावा याकरिता झगडत आहे.