बेळगाव: भीमा कोरेगाव शौर्य दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे साजरा करण्यात आला. तसेच 500 त्या महार शूरवीरांना अभिवादन करण्यात आले.
भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील डॉ बाबासाहेब उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमता भीम ज्योतीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व बेळगाव उत्तरचे आ असिफ राजू शेठ यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्राध्यापक के डी मंत्रीशी यांनी त्या 500 महार शूरवीरांच्या पराक्रमा विषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभाचे वाय पी गडीनाईक दलित नेते महेश चौगुले,मल्लेश कुरंगी,दलित संघर्ष समितीचे राज्य संघटक सिद्धापन्ना कांबळे,गुरप्पणा कोलकर, तहसीलदार अशोक असोगी यांच्यासहित मोठ्या संख्येने दलित बांधव उपस्थित होते.