बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भातकांडे गल्लीतील नागरिकांची रस्ता रूंदीकरणाबाबत सोमवार दि 23 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दैनंदिन जीवनात आखूड रस्त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय, व्यापाऱ्यांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. रस्ता रूंदीकरणाबाबत भातकांडे गल्लीतील नागरिकांच्या मागण्या आणि रूंदीकरणाचे स्वरूप चर्चेद्वारे जाणून घेण्यात आले. रस्ता रूंदीकरणाला भातकांडे गल्लीतील 90% नागरीकांनी पाठिंबा दिला असून. लवकरच हा रस्ता रूंदीकरणाचा अहवाल अर्ज आमदारांना सादर करण्यात येणार आहे.
शक्य तितक्या लवकर भातकांडे गल्लीचे नुतनीकरण आम्ही करून घेऊ असे गल्लीतील प्रमुख नागरिक श्री. दयानंद कंग्राळकर, श्री. विजय मुचंडीकर, श्री. मल्लाप्पा भातकांडे श्री. गजानन धामणेकर, श्री. शिवाजी भातकांडे, श्री. संजय बेळगावकर, श्री. महेश नागोजीचे, श्री. संजय पवार, श्री. विनायक भरडे, श्री. सागर भातकांडे श्री. विक्रम भातकांडे यांनी गल्लीतील रहिवाशांना अश्वासन दिले.