धारकऱ्यांनी केला भंडारा कार्यक्रम साजरा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी विभागावर भंडारा करण्याचा आदेश दिला होता त्यामुळे त्यांचे आदेशाचे पालन करत शहर आणि तालुक्याच्या विविध भागात एकत्रित येत सर्व धारकऱ्यांनी भंडारा कार्यक्रम साजरा केला.
यावेळी श्री भीमाशंकर ते शिवनेरी गडकोट मोहीम ज्या धारकऱ्यांनी केली. त्या गडकोट मोहिमेमधील हजारो धारकरांनी सहभाग घेतला होता.
त्यानुसार काल शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे तुळजाभवानीचा भंडारा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा भंडारा कार्यक्रम कपिलेश्वर तलाव जवळ पार पडला यावेळी शेकडो धारकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित लावून भंडारा कार्यक्रम उस्फूर्तपणे पार पाडला.