आज तारखेनुसार असलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
एक अनुभव आज मांडावासा वाटला .
नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली ,या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अभय पाटील साहेबांबरोबर बोलत असताना बऱ्याचवेळा सांगितले की ,साहेब तुम्ही तुमच्या कार्यकाळात जगातील पहिल्या वॉटर स्क्रीन वर आधारित शिवचरित्राची निर्मिती केली ,2018 मध्ये निवडून आल्यावर अनगोळ मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव मांडून तो पास करवून घेतला, आणि अनगोळ वासियांचे स्वप्न असलेली भारतातील सगळ्यात उंच असलेली 17 फुटी मूर्ती , स्वखर्च आणि महानगरपालिका अशा संयुक्त विद्यमाने करून ती अनगोळवासीयांना समर्पित केली ,प्रत्येकवेळच्या गडकोट मोहिमेसाठी अनेक मंडळांना मदत केली .छत्रपती शिवाजी महाराज ,धर्मवीर संभाजी महाराज तसेच अनेक महापुरुषांच्या अनेक मूर्ती लोकार्पण केल्या . तर हे सगळं आपण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेसमोर मांडूया .
त्यावेळी अभय पाटील साहेबांनी एक अशी गोष्ट सांगितली जी मी आयुष्यात कधीच विसरणार नाही .ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत ,आणि भगवा म्हणजे आपलं श्रद्धास्थान आहे त्यामुळे याचा निवडणुकीसाठी वापर करून मी कधीच राजकारण केलेलं नाही ,किंवा यापुढे कधी करणारही नाही .
तर इथे सांगण्यासारखं एकच की त्यांच्या ह्या तत्त्वांमुळे आणि विचारांमुळे च आम्ही त्यांच्याशी जोडले गेलोय.
– प्रविण पिळणकर