बेळगाव-येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला उत्कृष्ट सहकारी सोसायटी म्हणून गौरविण्यात आले. बुधवारी जे एन एम सी च्या सभागृहात झालेल्या 71 व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या सांगता समारंभात समर्थ सोसायटीचे चेअरमन ऍड अजय सुनाळकर व व्हाईस चेअरमन अभय जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शाल, श्रीफळ ,प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि फळाची करंडी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सोसायटीचे संचालक विनायक जोशी, अरविंद कुलकर्णी, सौ सुनंदा आळतेकर, श्रीमती छाया जोशी, मालतेश पाटील, प्रदीप कुमार कुलकर्णी, गणपतराव कुलकर्णी, अनिल भंडारी, उमेश सुनगार व परशुराम कांबळे यांच्यासह सेक्रेटरी राघवेंद्र केसनुर हेही उपस्थित होते.
समर्थ सोसायटी चे मुख्य कार्यालय समर्थ भवन,मारुती गल्ली बेळगाव येथे असून संस्थेच्या शाखा शहापूर, टिळकवाडी, राणी चन्नम्मा नगर व खानापूर येथे कार्यरत आहेत. संस्थेने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय अशी प्रगती केली असून आज शहरातील एक प्रतिष्ठित संस्था म्हणून समर्थ सोसायटी कडे पाहिले जाते. यापूर्वी समर्थ सोसायटीला अशा प्रकारच्या अनेक पुरस्कारानीं सन्मानित करण्यात आले आहे.