बेळगाव: गोंधळी गल्ली येथील ॲपटेक एव्हिएशन व हॉस्पिटिलिटी अकॅडमीचा सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ॲपटेक एव्हिएशनच्या संपूर्ण भारतभर १२० शाखा आहेत. त्यामध्ये बेळगावच्या शाखेला बेस्ट प्लेसमेंट आणि अकॅडमीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष श्रवण सिंग यांनी शनिवारी गोंधळी गल्ली येथील बेळगाव शाखेला भेट दिली. यावेळी ॲपटेक एव्हिएशनचे बिझनेस पार्टनर विनोद बामणे यांचा त्यांनी पुरस्कार देऊन देशातील सर्वोत्कृष्ट शाखा असल्याचे सांगितले.
बेळगावमधील ॲपटेकच्या शाखेने गेली १४ वर्ष अनेक पुरस्कार मिळवून बेळगावचा नावलौकिक केला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट आणि अकॅडमिक पुरस्कार देऊन त्यांनी शाखेला गौरविले.
विनोद बामणे यांच्या प्रयत्नातून या शाखेमधून हजारो विद्यार्थी आज एव्हिएशन क्षेत्रामध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.याप्रसंगी सरस्वती इन्फोटेकच्या एम.डी.ज्योती बामणे,ॲपटेक एव्हिएशन अकॅडमीचे स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.