बेळगाव:
मध्यंतरी लगातार पावसाने धुमाकूळ घातला. परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोंबर महिन्यातील हिवाळी हंगामामध्ये बेळगावकरांनी पावसाचा अनुभव घेतला. बुधवारी मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश होता . त्यामुळे बेळगावकरांनी बुधवारी ऑक्टोंबर हिट अनुभवला.
मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे पावसाळा की हिवाळा हे काही समजले नव्हते. ज्या दिवसांमध्ये अंगातून घामाच्या धारा निघायच्या त्या दिवसांमध्ये धुवाधार पावसामुळे अंग भिजून गेल्याचा अनुभव समस्त बेळगावकरांनी घेतला. बुधवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. अंगामधून घामाच्या धारा निघत होत्या. सूर्य आग ओकत होता. त्यामुळे बाजारपेठेमध्ये बरेचसे नागरिक छत्री घेऊन जाताना दिसून आले. तसेच शीतपेयांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.