बेळगावकरांना लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव उपलब्ध
बेळगाव :
बेळगाव शहराला क्रीडा क्षेत्रात नवा आयाम मिळणार आहे. अशोकनगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने उभारलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा 50 मीटर जलतरण तलाव आता अंतिम टप्प्यात असून लवकरच तो नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या आधुनिक सोयीसुविधांनी युक्त जलतरण तलावामुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील स्विमिंगपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेता येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी खेळाडूंना मोठा फायदा होणार असून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेने जलतरणपटूंच्या सोयीसाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून लवकरच उद्घाटन करून तलाव सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात येणार आहे.
या सुविधेचा लाभ सर्व नागरिक व क्रीडाप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.