बेळगाव उत्तरचे आ आसिफ (राजू) सैठ यांचा वीरभद्र नगर येथे जनता दरबार
बेळगाव : उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सैठ यांनी वीरभद्र नगर येथे जनता दरबार घेऊन थेट नागरिकांशी संवाद साधला. या वेळी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी गरजांबाबत नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि विकासविषयक प्राधान्यक्रम जाणून घेतले.
जनता दरबारानंतर आमदार सैठ, युवा नेते अमान सैठ, स्थानिक नेते आणि नगरसेवकांसह परिसरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी नगरसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींनी सुरू असलेल्या तसेच प्रलंबित कामांची माहिती दिली. आमदार सैठ यांनी नगरसेवकांना प्रकल्पांच्या नियोजन आणि रचनात्मक तपशीलांचा नियमित अहवाल देण्याचे निर्देश दिले तसेच तातडीच्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
नागरिकांनी आमदारांचा प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेण्याच्या सक्रिय पद्धतीचे स्वागत केले. आमदार सैत यांनीही त्वरित आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले, तसेच कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.