This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन*  

*5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन*  
D Media 24

*5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन*

 

बेळगाव -अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी “चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2023 मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे . अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.

बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक डी. बी. पाटील फोटो स्टुडिओच्या दालनात घेण्यात आली . यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र पाटील होते .

या बैठकीत सर्वानुमते चौथे साहित्य संमेलन चार सत्रात घेण्याचे ठरविण्यात आले . पहिले सत्र ग्रंथ दिंडीने सुरुवात करून उद्घाटन व संमेलनाध्यक्ष भाषण , दुसरे सत्र – कथाकथन , तिसरे सत्र- कविसंमेलन व चौथे सत्र – मनोरंजनातून प्रबोधन या चार सत्राचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले .

हे बेळगाव नगरीतील साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी परिषद व मराठा मंदिर कार्यकारणी प्रयत्नशील आहे .

यावेळी परिषदचे जिल्हाध्यक्ष अॅड सुधीर चव्हाण , उपाध्यक्ष डी. बी. पाटील , सचिव रणजित चौगुले , सुरज कणबरकर , संजय गुरव , अरुणा गोजे – पाटील , रोशनी हुंदरे , मनिषा नाडगौडा , संजिवनी खंडागळे , गीता घाडी , सविता वेसणे , नेत्रा मेणसे , स्मिता चिंचणीकर , स्मिता मेंडके यासह आदी उपस्थित होते .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply