बेळगाव तापले
शितपेयांच्या मागणीत वाढ
बेळगाव:
सध्या एप्रिलचा दुसरा आठवडा संपला आहे. अजूनही किमान दिड ते पावणेदोन महिने पाऊस लांबणीवर आहे. तोपर्यंत बेळगावकरांना असह्य होणारा उन्हाळा सोसावा लागणार आहे. उन आग ओकत आहे. अंगाची लाही लाही होत आहे. बेळगावचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शितपेयांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
बेळगावची गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळख आहे. मात्र आता हेच गरिबांचे महाबळेश्वर खूप तापू लागले आहे. या वाढत्या गर्मीमुळे नागरिक बाजारपेठेत 10 नंतर दुपारी चार वाजेपर्यंत यायला घाबरत आहेत. नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक , कोकम यासारख्या शितपेयाच्या मागणीत वाढ होत आहे.
टोपी , गॉगल्स यासारख्या वस्तूंच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे टोप्या, गॉगल्स यांचे देखील भाव वाढले आहेत. घराघरांमध्ये, कार्यालयामध्ये पंख्यांची घरघर सुरू असल्याचे दिसत आहे. काकडी , कलिंगडे यासारख्या रसाळ आणि पाणीदार पदार्थांच्या मागणीला जोर आला आहे. शहरांमधील कावेरी कोल्ड्रिंक्स मध्ये ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे.