नंदादीप नेत्रालय येथे बेळगाव जिल्हा जेष्ठ नागरिक सोसायटीचा सन्मान आणि मोफत नेत्र तपासणी
नंदादीप हॉस्पिटलच्या फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सल्ला शिबीर अंतर्गत नंदादीप हॉस्पिटल बेळगाव शाखेतर्फे सर्व बेळगाव जिल्हा जेष्ठ नागरिक सोसायटीच्या सर्व जेष्ठ नागरिकांचा सन्मान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा लाभ ५० हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला.https://dmedia24.com/shri-vishwakarma-seva-sangh-organized-a-gathering-on-the-bride/
या शिबिराची सुरुवात अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांच्या मनोगताने झाली त्यामध्ये त्यांनी डोळ्यांसंधर्भातील कोणत्याही समस्येसाठी नंदादीप हाच एक उत्तम पर्याय बेळगाव मध्ये आपल्या सेवेत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले, नंदादीप च्या सेवेचा लाभ घेतलेले व जेष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी श्री. सुरेंद्र देसाई यांनी NABH मानांकन असलेले बेळगाव मधील एकमेव नेत्रालय म्हणून त्यांनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याचा विचार केला होता आणि तो त्यांच्या उपचार आणि यशस्वी शाश्त्रक्रिये नंतर त्यांना सार्थ ठरल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी, सेक्रेटरी श्री. सुरेंद्र देसाई, संचालक श्री. रघुनाथ मुतालिक, श्री. विजय वाईंगडे यांनी सहभाग व त्यांचे मनोगत नोंदवले.
नंदादीप नेत्रालय मार्फत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद तुप्पद यांच्या मार्फत करण्यात आले. कार्यक्रमाच्या कार्याध्यक्ष डायरेक्टर व मुख्य नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पाटील यांच्या मार्फत या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी घ्यावा हि विनंती करण्यात आली.
कार्यक्रमास नंदादीप नेत्रालयाच्या बेळगाव शाखेचे व्यवस्थापक श्री. अनिरुध्द सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी श्री. आनंद तुप्पद व सर्व स्टाफ ची उपस्थिती होती.