बेळगांव देवेन बामणेचा आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभाग – रोख पारितोषिक देऊन सन्मान
बेळगाव :
कर्नाटकाच्या रोलर स्केटिंग असोसिएशनशी वतीने असलेल्या खेळाडू देवेन विनोद बामणे यांनी दक्षिण कोरिया येथे झालेल्या २० व्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियन २०२५ या स्पर्धेत (१९ ते २९ जुलै २०२५) भारताचे प्रतिनिधित्व करून कर्नाटकाचा आणि देशाचा लौकिक उंचावला आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने देवेन याला रोख पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
देवेन यांनी इनलाईन फ्रीस्टाईल या प्रकारात सहभाग घेतला. त्यांच्या मेहनती, चिकाटी आणि खेळातील समर्पणामुळे ते तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेले देवेन यांच्यामुळे भारताच्या रोलर स्केटिंग खेळाडूंच्या प्रगतीला नवे दालन खुले होत आहे.
कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. एम. लक्ष्मीनारायण (IAS), महासचिव श्री. इंदुधर सीताराम आणि खजिनदार श्री. लोकेश्वरियाह यांनी रोख पारितोषिक देऊन देवेन यांचे कौतुक करत भविष्यातील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेन यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर कर्नाटक आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.