बेळगाव शहर माध्यमिक क्रीडाशिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा सोमवारी.
बेळगाव तारीख ,21. टिळकवाडी येथील वॅक्सिंन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या एकदिवशीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सोमवार ता 24 फेब्रुवारी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत बेळगाव शहरातील माध्यमिक शालेय गटातील टिळकवाडी विभाग, कॅम्प विभाग, शहापूर विभाग, व उत्तर विभागातील संघात ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला सकाळी 10.00 जिल्हाशिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री उपमहापौर आनंद चव्हाण पुरस्कर्ते साईराज डेव्हलपरचे संचालक महेश फगरे ,अस्मिता इंटरप्राईजेस संचालक राजेश लोहार ,प्रेझेंट कॉन्व्हेंट शाळेचे अध्यक्ष यशोधर जैन, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमनाचे, क्रीडाभारती राज्यसचिव अशोक शिंत्रे, विश्वास पवार, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्विया डिलिमा, टिळकवाडी माध्यमिक विभागाच्या विविध शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, गायत्री शिंदे डॉ नवीन शेट्टीगार, सविता जेके, नंदिनी मुतालिक देसाई, सावित्री नाईक ,शोभा कुलकर्णी, स्नेहल पाटील,
उपस्थित राहणार आहेत या उद्घाटनप्रसंगी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक विवेक पाटील उमेश कुलकर्णी, अशोक बुडवी ,यांचा सत्कार करण्यात येणार आहे.