जिल्हास्तरीय शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगांव शहराला विजेतेपद.
बेळगाव ता,28. टिळकवाडी येथील वॅक्सिंग डेपो मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत बेळगांव शहराने बेळगांव ग्रामीण संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले सामनावीर देवेंद्र कुडची,उकुष्ट गोलरक्षक उमेश बेळगुंदकर, उकुष्ट झेल प्रकाश बजंत्री,
उकुष्ट फलंदाज संतोष मेलगे
मालीकावीर किरण तरळेकर यांना देण्यात आला.https://dmedia24.com/the-invitation-to-unveil-the-8th-all-india-belgaum-marathi-literature-conference/
पहिल्या उपांत्य सामन्यात बेळगाव ग्रामीण संघाने रामदुर्ग तालुक्याचा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात बेळगाव शहरने बैलहोंगल संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम लढतील प्रथम फलंदाजी करताना बेळगाव ग्रामीण संघाने 8 षटकात 31 धावा केल्या प्रत्युत्तरदाखल खेळताना बेळगाव शहरने 3.2 षटकात 2 बाद 32 धावा करीत सामना 8 गड्यांनी जिंकला व या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी,संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार,जी जी चिटणीस शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ नवीना शेट्टीगार,केएलएस शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक देसाई,
चंपाबाई भोगले शाळेचे मुख्याध्यापक वाय एम वंगण्णावर, विवेक पाटील,एच व्ही मास्तीहोळी, विश्वास गावडे नारायण पाटील, नागराज भगवंतण्णावर, चंद्रकांत पाटील, बापूसाहेब देसाई उमेश मजुकर यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, वरिल संघ आगामी मंगळुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.विजेत्या क्रीडाशिक्षक संघात जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, प्रवीण पाटील, संतोष दळवी, देवेंद्र कुडची, सचिन कुडची, अर्जुन भेकने चंद्रकांत पाटील,नागराज भगवंतण्णावर,किरण तरळेकर ,अनिल जनगौडा, दत्ता पाटील , प्रकाश बजंत्री,बाबु देसाई, मंजुनाथ देगानट्टी विठ्ठल मुळकुर यांचा संघात समावेश होता.