विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धत बेळगांव बंगळूर अंतिम फेरीत .
बेळगाव ता,8. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगांव जिल्हा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धत बेळगांव बंगळूर यांनी अतिम फेरीत प्रवेश केला.
संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात स्पर्धेला गुरुवार ता 7 रोजी प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रकाश पुजारी ,जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, संत मीरा हिंडलगा शाळेचे सचिव प्रसाद कुलकर्णी, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर ,उपाध्यक्ष रामनाथ नायक ,संत शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, संत मीरा गणेशपुर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील
,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तर अध्यक्षस्थानी कर्नाटक विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे उपस्थित होते .
प्रारंभी सरस्वती ओंकार भारत माता फोटोची पूजन व दीपप्रज्वलन करून व खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी श्रद्धा मेंडके यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, अनुराधा पुरी, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रकाश पुजार यांनी शालेय जीवनातील गोष्टींना उजाळा देत सध्याच्या स्पर्धात्मक युगात क्रीडा स्पर्धेला फार महत्त्व असून खेळाडूंनी यात भाग घेऊन आपले प्राविण्य दाखवावे व शाळेसह आपले नाव नावारूपास आणावे असे सांगितले, तर लक्ष्मण पवार यांनीही खेळाडूंनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी नियमीत सराव व अभ्यास करत विद्यार्थी जीवन सार्थक करावे.
यानंतर विद्याभारतीच्या विविध उपक्रमाची माहिती ही राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी दिली. शालेय खेळाडू हिंदवी शिंदे हिने सर्व सहभागी खेळाडूंना शपथ देवाविली. याप्रसंगी पंच जयसिंग धनाजी, उमेश मजुकर ,प्रशांत वाडकर , बापू देसाई, यश पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर तर श्रद्धा मेंडके हिने आभार मानले.स्पर्धेत बेळगाव बंगळूर गुलबर्गा संघानी भाग घेतला आहे.