दसरा क्रीडा स्पर्धा : हॉकीत बेळगाव ११ व साऊथ बेळगाव संघ विजयी
बेळगाव :
कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा क्रीडा स्पर्धा २०२५-२६ दि. ८ ते १० सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या. या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदान येथे पार पडल्या.
स्पर्धेच्या प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. हॉकी बेळगावच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला.
मुलींच्या गटात बेळगाव ११ संघाने खानापूर ११ संघावर ३-१ असा विजय मिळवला. तर मुलांच्या गटात साऊथ बेळगाव संघाने ४-२ असा निकाल लावत नॉर्थ बेळगाव संघावर मात केली. विजयी संघांची दसरा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धा विजेत्या खेळाडूंना चषक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, मनोहर पाटील, सविता वेसणे, एस. एस. नरगोदी, गोपाळ खांडे, सुरेश पोटे, दत्तात्रय जाधव, आशा होसमनी, महांतेश साबोजी, यल्लाप्पा हिरेकुरबर, साकीब बेपारी, दीपक वेसणे आदी मान्यवर उपस्थित होते.