अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीवर विजया ऑर्थो सेंटर मध्ये यशस्वी उपचार
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ७२ वर्षीय व्यक्तीला विजया अर्थो ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया आणि उपचार करून जीवदान देण्यात यश आले . २१ जून रोजी दुपारी २:३० च्या सुमारास, ७२ वर्षीय विठ्ठल तानाजी शिळके हे रामनगर जवळील टिंबोली गावात आपल्या सुनेच्या घरी जात असताना दोन पूर्ण वाढ झालेल्या अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्या वृद्धावर प्राणघातक हल्ला झाला तो महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील माळुंगे गावातून रामनगरला गेला होता .
तेथून तो एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवरून लिफ्ट घेऊन घरी येण्यासाठी २ किमी जंगलात गेला, तेव्हा वाटेत दोन अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये खूप रक्तस्त्राव झाला आणि त्याचे कपडे पूर्णपणे रक्ताने नाहून निघाले. त्यानंतर त्याने दुपारी चारच्या सुमारास तो एकटाच ‘घरी गेला आणि नंतर वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांना रामनगर येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले व पुढील उपचारासाठी बेळगाव येथील विजया ऑर्थो व ट्रॉमा सेंटर येथे आणण्यात आले. अपघात झाला तेव्हा रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती.
ऑर्थोपेडिक सर्जन, भूलतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन, नर्सिंग आणि पॅरामेडिकल व्यावसायिकांसह अनुभवी डॉक्टरांची एक टीम रुग्णाच्या उपचारात गुंतलेली. काही मिनिटांतच रक्तस्त्राव थांबला, रुग्ण स्थिर झाला, सीटी स्कॅन करण्यात आले त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात घेऊन जाऊन रक्त पुरवठा करण्यात आला अनुभवी आणि सक्षम प्रयत्नांमुळे जखमींची प्रकृती सुधारत आहे. प्लास्टिक सर्जरीचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. कौस्तुभ देसाई, डॉ. अतिदक्षता विभाग- अनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. श्रीधर काटवटे आणि कुशल वैद्यकीय पथकाने धोका टाळण्यात यश मिळविले. जगलपेठ विभागीय वन अधिकारी श्री चंद्रकांत हिप्परगी यांनी अस्वलाच्या हल्ल्याची माहिती शेअर केली असून ते विजया हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात असून रुग्णाच्या उपचाराची सर्व माहिती घेत आहेत.