बेळगांव: सांगली येथे झालेल्या नाबालिक ४ वर्षाच्या मुलीवर ४६ वर्षाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार करून त्या मुलीचा खून केल्याची घटना घडली आहे. त्या नराधमा विरोधात हिंद के फरिश्ते या संघटनेकडून आरटीओ सर्कल ते चित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंत कॅण्डल मार्च काढण्यात आला.
ही घटना ६ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली असून त्या ४६ वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन जेलमध्ये घालण्यात आले आहे. ४ वर्षाच्या नाबालिक मुलीवर बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदके फरिश्ते या संघटनेकडून करण्यात आली.
हा कॅन्डल मार्च मुक्ती मंजूर मिसबाई, नगरसेवक मुझेमील डोनी ,कलमुद्दीन शहा मकानदार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.