पावसाळ्यात कोणत्या ना कोणत्या आजाराची लागण ही होतेच. आता देखील या पावसाळ्यात मद्रास आय या नवीन रोगाची लागण पसरू लागली आहे मद्रास आहे नावाच्या डोळ्यांचा आजार आता सर्वत्र पसरत असून या आजारामध्ये डोळी चुरचुरणे लाल होणे डोळ्यातून पाणी वाहने पु येणे ताप येणे असे या रोगाची लक्षणे आहेत.
हा रोग होऊ नये याकरिता नागरिकांनी सर्व ती खबरदारी घ्यावी याकरिता आरोग्यधिकार्यांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका गटशिक्षदाधिकाऱ्यांसोबत मद्रास आय संदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
या रोगापासून सर्वांचे रक्षण व्हावे याकरिता रुग्णाने आपल्याकडे सदैव रुमाल बाळगावा त्याचे अंथरूण वेगळे असावे कपडे टॉवेल नेहमी स्वच्छ ठेवावे तसेच नेहमी गरम पाण्याने हात पाय धुवावे गरम पाण्याने नियमित आंघोळ करावी वैद्याच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
मद्रास आय ची लागण झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये तसेच अशा प्रकारची लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.