बसवण कुडचीत खा.जगदीश शेट्टर यांचा सत्कार.
बसवण कुडची येथील गावाकऱ्यांतर्फे माजी मंत्री तसेच खासदार जगदीश शेट्टर व माजी आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला.
गावचे सामाजिक कार्यकर्ते परशराम बेडका यांनी आयोजित केलेल्या कुडची प्रीमियर लीग या क्रिकेट च्या मॅच चे आयोजन केले होते. प्रारंभी पाहुण्यांचा फेटा बांधून बैल जोडी पुतळा देऊन शाल घालून सत्कार करण्यात आला.या निमित्त भाजप किसान मोर्चा व गावकऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कुडची प्रीमियम लीग (के पी एल) चे आयोजन करून गावातील युवा पीढीला एक केल्या बद्धल परशराम बेडका यांचे खासदार जगदीश शेट्टर व माजी आमदार अनिल बेनके यांनी अभिनंदन केले.स्वागत व आभार महेश इटगेकर यांनी केले.
यावेळी मुरगेंद्रगौडा पाटील किसान मोर्चा अध्यक्ष संतोष चौगुला, ,बसवंत कौलगी,यल्लाप्पा मुचंडीकर,राजु मुतगेकर,भरत चौगुला, बस्सू चौगुला, भरमू वंडरोटी, पायानी जोडगुंडे,विठ्ठल तारीहाळकर, राजु बोगार, किसण भातकांडे,व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.