बॅरिस्टर नाथ व्याख्यानमाला सोमवारचे व्याख्याते अभिनेते प्रसाद पंडित
बेळगाव- सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवार दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात बेळगावचे जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित हे गुंफणार आहेत. “माझा नाट्यप्रवास” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे .
प्रसाद पंडित यांचा अल्प परिचय
प्रसाद पंडित हे ज्येष्ठ अभिनेते म्हणून सर्वांना परिचयाचे आहेत. आभाळमाया, समांतर, किमयागार, दामिनी, छत्रपती शिवाजी महाराज, हारजीत, चिरंतन, कुंकू, स्वप्नांच्या पलीकडले, दूर्वा, माझे मन तुझे झाले, तू माझा सांगाती मध्ये एकनाथ महाराजांची भूमिका, लेक माझी लाडकी, स्वाभिमान, सुंदर आमचे घर ,दूरदर्शनवर मर्मबंधातील ठेव , हारजीत, चिरंतन, हसन्यावारी घेऊ नका, या प्रमुख मराठी मालिका मधून त्यांनी भूमिका साकारलेली आहे. तसेच अनामत, इत्तेफाक ,सर्व गुणसंपन्न, मधुबाला ,कारावास, सिद्धी, विरासत, अकबर बिरबल या हिंदी सिरीयल मध्ये ही त्यांनी काम केले आहे .सत्वपरीक्षा, घे भरारी, आता मी कशी दिसते ,प्रेम सूत्र ,मोहन आपटे, रात्र आरंभ ,पिंडदान अशा अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. याचबरोबर गुड बाय डॉक्टर ,अश्रूंची झाली फुले, घडायचं होतं वेगळच ,मी माझ्या मुलांचा ,काशीचक्र, तिची कहाणी ,खरच माझ्यासाठी ,घरोघरी, आनंद तरंग ,फायनल डिसिजन अशा अनेक मराठी नाटकांमधूनही त्यांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे.
घडायचे होते वेगळेच ,आनंद तरंग ,एक भाऊ चार भाऊ, इन्स्पेक्शन, कामासाठी वाटेल ते आणि हसत हसत जगायचे या मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केले आहे .
125 एकांकिका मध्ये लेखनाचे प्रथम पारितोषिक आणि सादरीकरणांमध्ये चार प्रमुख केंद्रामध्ये प्रथम पारितोषिक मिळवणारे मराठी फिल्म व मराठी नाट्य दिग्दर्शन, कथा ,पटकथा, संवाद ,उत्कृष्ट अभिनेता याकरिता त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे हे दर्दी कलाकार बेळगावकरांना आपल्या खुमासदार शैलीत आपला अनुभव सांगून वेगळ्या विश्वात नेतील.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड व कार्यवाह सुनिता मोहिते यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले आहे .