भटक्या जनावरांचा वाहतुकीला अडथळा
बेळगाव, प्रतिनिधी:
शहरातील नार्वेकर गल्ली येथे गुरुवारी दुपारच्या वेळेला भटकी जनावरे रस्त्याच्या अगदी मधून जात होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे वाहन चालकांकडून महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. महापालिकेने अशा भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करताना नागरिक दिसून आले.
यावेळी वाहन चालकांना वाहन कुठून पुढे न्यावे असा विचार करावा लागत होता. त्यामुळे वाहन चालकांनी काहीवेळ थांबून रस्त्याच्या टोकाकडूनच वाहन पुढे नेणे पसंत केले. कितीही हॉर्न वाजविला तरीही भटकी जनावरे काही केल्या रस्ता मोकळा करण्याचे नाव घेत नव्हती. जणूकाही या जनावरांनी रस्ता आपलाच आहे , असा मुक इशारा वाहन चालकांना दिल्याचे जाणवले.
ही पाच मूक जनावरे रस्त्याच्या अगदी मधून जात होती. त्यामुळे चालत जाणारे आणि वाहनावरून जाणारे वाहन चालक देखील काही काळ एकाच ठिकाणी थांबून होते. https://dmedia24.com/wasted-thousands-of-liters-of-water-at-yelur/
भटके जनावरे रस्त्याच्या मधून जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील अशा भटक्या जनावरांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तेव्हा महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहन चालक तसेच समस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. जर महापालिकेने अशा जनावरांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर नागरिकांकडून महापालिकेवर मोर्चा नेण्यात येईल , असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.