शिनोळी बुद्रुक येथील ह भ प कै बाळकृष्ण रुक्माना सुतार यांचे काल वृद्धापकाळात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 85 वर्ष होते.
वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व, प्रवचन कीर्तन भजन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. तंत्रज्ञान विषयात निष्णात असणारे, कलाकार व्यक्तिमत्व आपल्या कौशल्याच्या जोरावर उद्योग निर्मिती करून एक आदर्श निर्माण केला. संगीत नाट्य या विषयांमध्ये निष्णात होते. त्यांच्या जाण्याने शिनोळी गावावर तसेच सुतार परिवारावर आकस्मिक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात त मुलगा तीन विवाहित मुली सून नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दि.25/8/2025 रोजी सकाळी ठीक आठ वाजता स्मशानभूमी शिनोळी येथे होणार आहे.