बेळगावात नेत्रदान जनजागृती जाथा : तरुणाईतून सामाजिक संदेशाचा जाग
बेळगाव : भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) बेळगाव शाखा, नेत्रदर्शन सुपर मल्टी आय स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने संचालित डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल आणि ठळकवाडी प्रौढशाळेच्या इंट्रॅक्ट क्लब विद्यार्थिनींच्या सहभागातून नेत्रदान महादानाबाबत जनजागृती जाथा काढण्यात आला.
हा जाथा टिळकवाडी आरपीडी कॉलेज परिसरातून सुरू होऊन सोमवार पेठ, बुधवार पेठ मार्गे अनगोळ नाका येथे संपन्न झाला. यावेळी डॉ. सचिन माहुली व डॉ. अवधूत वागळे यांनी नेत्राचे महत्त्व, नेत्रदानाची गरज व दान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
जाथ्याला ठळकवाडी प्रौढशाळेचे मुख्याध्यापक आर. आर. कुडूतूर यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करून दिला. या उपक्रमात संजीव एस. कोश्टी यांच्यासह नेत्रदर्शन हॉस्पिटलचे कर्मचारी सक्रिय सहभागी झाले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन उदयकुमार यांनी केले.
या उपक्रमामुळे तरुणाईतून समाजहिताचा जागर निर्माण झाला असून “नेत्रदान हेच महादान” हा संदेश ठळकपणे पोहोचविण्यात आला.