*बेळगांव महानगरपालिके तर्फे वॉर्ड क्रमांक 21 मध्ये कचरा संदर्भात जनजागृती*
ओला आणि सुका कचरा संदर्भात व रस्त्यावर कचरा टाकू नका या विषयावर बेळगांव महानगर पालिके तर्फे जनजागृतीचे काम सुरू करण्यात आले आहे वॉर्ड क्रमांक 21 मध्ये नुकताच हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला या वॉर्ड मधील नागरिकांना या बद्दल माहिती देण्यात आली यावेळी या भागातील नगरसेविका प्रीती कामकर यांच्या मार्गर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी समाजसेवक श्री विनायक कामकर, संतोष श्रिंगारी, बाळू मिराशी, सुर्यकांत हिंडलगेकर, शंकर कांबळे,श्री गुडी, बेळगांव महानगरपालिकेचे, अधिकारी, कर्मचारी, टीचर्स कॉलनी, श्रिंगारी कॉलनी,बाडीवाले कॉलनी, कुंती नगर, येथील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते तसेच श्रिंगारी कॉलनी व टीचर्स कॉलनी येथील रोडवरील ब्लॉक स्पॉट हटवण्यात आला