व्हीं व्हीं पॅट मशीन बाबत जनतेत जागृती
कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र आणि व्हीं व्हीं पॅट मशीन बाबत जनतेत जागृती करण्यासाठी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील बस स्थानकावर मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून जनतेत जागृती निर्माण करण्यात आली.मतदान यंत्राचे बटण दाबल्यावर पुढील प्रक्रिया कशी होते याची माहिती बस स्थानकावर प्रवासी आणि एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात आली.मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदानाची स्लीप कशी बाहेर पडते याची माहिती देखील देण्यात आली.
यावेळी अनेकांनी मतदान यंत्राचे बटण दाबून मतदान यंत्राच्या प्रात्यक्षिकाची माहिती घेतली.मतदान यंत्र प्रात्यक्षिक बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून जनतेला माहिती दिली जाणार आहे.बस स्थानक,रेल्वे स्थानक,ग्राम पंचायत येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.
बेळगाव शहरात फिरत्या वाहनाद्वारे एल ई डी स्क्रीन वरून मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून जनतेत जागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.