दिनांक 16 रोजी शांताई वृद्धाश्रम मध्ये कॅन्सर मधून मुक्त होऊन समाजाला संदेश देण्याचे काम बेळगाव शहरातील अपर्णा खानोलकर व त्यांच्या टीमने शांताई वृद्धाश्रमामध्ये आजींना कॅन्सर प्रिकॉशन घेण्यासंदर्भात नाटकाच्या स्वरूपात त्यांनी करून दाखवला स्वतः ब्रेस्ट कॅन्सर होऊन मरणाच्या दारात जाऊन परत येऊन आपलं छान जीवन जगत समाजाला कॅन्सर जना झालेला असेल त्यांना भेटून त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी काम करत असलेली अपर्णा खानोलकर आणि इतर कॅन्सर वॉरियर यांच्या शांताई वृद्धाश्रमामध्ये कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी सन्मान केला आणि समाजामध्ये इतर ज्या कॅन्सर पीडित असलेल्या दोन रुग्णांना जाऊन भेटून त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचे काम या टीम नक्की केलेला आहे . https://dmedia24.com/shri-mahalaxmi-durgadevi-and-shri-masani-devi-yatra-festival-at-shindoli-from-april-7/
आणि असं प्रत्येक भागामध्ये जाऊन ज्यांना कोणाला कॅन्सरची लागण झालेली आहे त्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर पडणं आणि कशा पद्धतीने औषध घेणं हे स्वतः अनुभवलेले अनुभव सांगून त्यांना मानसिक ताकद देण्याचे काम देण्याचे ठरवलेलं आहे आणि त्या संघटनेचे नाव पिंक वॉरियर्स असं ठेवण्यात आलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमामध्ये पिंक वॉरियर्स तालुक्यामध्ये किती असतील त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल असे माझे महापौर व शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे अध्यक्ष विजय पाटील त्यांनी पिंक वॉरियर्सना विनंती केली आणि शांतता वृद्धाश्रमामध्ये एक दिवसाचा कॅन्सर वारियर यांचा सन्मान व त्यामधून बाहेर पडण्यासाठी कार्य केलेल्या कॅन्सर वरती उपचार करत असलेले सर्व डॉक्टरांचा सन्मान असा दुहेरी कार्यक्रम घेण्यासाठी विनंती केले व या कार्यासाठी बेळगाव शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आपल्या पाठीशी सहकार करतील असे सांगण्यात आले शेवटी सर्व आश्रमातील आजा आजींनी तीन कॅन्सर वारियर यांना देवा तुझी काळजी रे ह्या गाण्यावरती आजी आजोबांनी या तिघांना पण आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.