शिवाजी कागणीकर यांना डॉक्टर पदवी प्रदान
बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना राज्यपाल थावरचंद गहलो यांच्या हस्ते मान डॉक्टर एक पदवी प्रदान करून गौरविण्यात आले आहे.शिवाजी काकणीकर यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.
कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विद्यापीठ गदग या विद्यापीठाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभ प्रसंगी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट पदवी मिळाली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या पदवीमुळे सीमा भागातील एका श्रमजीवी कार्यकर्ताचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिवाजी कागणीकर यांनी रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा यासाठी सातत्याने आंदोलन केले होते त्याचबरोबर ग्रामीण भागात पाणी समस्या सोडविण्यासाठी आणि शेतामधील तलावांची निर्मिती तसेच पाणी आडवा आणि जिरवा या योजनेसाठी स्वतः अथक परिश्रम घेतले आहेत.
त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पाहून तसेच त्यांनी केलेल्या कार्य पाहून त्यांना कर्नाटक राज्य पंचायत विभाग मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले आहे.
यावेळी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पदविधान सोहळ्यास कर्नाटक विज्ञान व तंत्रज्ञान अकादमीचे अध्यक्ष आणि इनफॉल केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलपती सुभाण्णा अय्यप्पन ग्रामीण विकास व पंचायत राज्य विद्यापीठाचे कुलगुरू विष्णुकांत चटपल्ली कुलसचिव प्राध्यापक जक्काणावर जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुशीला बी अप्पर जिल्हाधिकारी एमबी मारुती आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या सोहळ्यास शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह निमंत्रित व्यक्ती पालक आणि विद्यार्थी देखील बहुसंख्येने उपस्थित होते.