समिती नेत्यांना अटक : जिल्हाधिकाऱ्यांनी ही दाखविली पाठ
आज पुन्हा एकदा कानडी गांच्या दडपशाहीचा प्रत्यय सीमा भागातील मराठी नेत्यांना आला. निवेदन देण्याकरिता आलेल्या महाराष्ट्रकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी अटक केली. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी देखील निवेदन न स्वीकारता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पाठ दाखवून निघून गेल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाची प्रत देणार होते. मात्र यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आणलेली निवेदनाची प्रयत्न स्वीकारताच तेथून निघून गेले.
त्याबरोबरच कोणतेही पोलीस बंदोबस्त नसताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. यावेळी निवेदन देण्याकरिता दीपक दळवी मालोजीराव आष्टेकर शुभम शेळके रमाकांत कोंडुस्कर सरस्वती पाटील यांच्यासह अन्य समितीचे सदस्य उपस्थित होते.