बेळगाव आणि रामदुर्ग येथील वकिलांवर झालेल्या हल्ल्यांनी कायदेविषयक समुदायात गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वकील विनोद पाटील यांवर रामदुर्ग येथे कृष्णा लमानी यांच्यावर २० जणांनी हल्ला केल्याचे तसेच बेळगावमधील कणबर्गी परिसरात वकील राहुल टत्यांगी यांच्यावरही हल्ला झाल्याचे समजून आले आहे. या घटनांमुळे राज्यात वकिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
वकील एन.आर. लातूर यांनी गृहमंत्र्यांकडे पोलीस खात्याच्या निष्क्रियतेवर टीका करताना तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, “हल्लेखोरांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलीस प्रशासन निष्क्रिय झाले आहे. वकिलांच्या सुरक्षेसाठी ठोस यंत्रणा उभारल्या जाणे गरजेचे आहे.” https://dmedia24.com/summer-camp-for-students/
बेळगावमधील वकिलांच्या संघटनांनीही या घटनांवर नाराजी व्यक्त करून पोलिसांनी आरोपींना लगेच अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्तालयाकडे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.असे सांगितले जाते. मात्र, गुन्हेगारांना ताबडतोब पकडण्यासाठी पोलिसांनी गंभीरतेने पावले उचलले नाहीत, याबद्दल वकिलांचा रोष आहे.
राज्यातील कायदेविषयक व्यवसायाशी जोडलेल्या व्यक्तींवरील हल्ले वाढत असल्याचे या घटनांमुळे पुन्हा उघडकीस आले आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणी लगेचच हस्तक्षेप करून पोलिसी कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. वकिलांच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक पावले उचलण्याची मागणी समाजातील विविध घटकांकडूनही होत आहे.
https://youtube.com/shorts/n-Wwtz-JTI0?si=gi1feS-iaZExr5Ak