बेळगाव जवळील सांबरा गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम चोरट्यानी फोडून त्यातील रोख रक्कम लांबवली.
बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. चोरट्यानी गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडले आहे.ए टी एम मशीन मधून
चोरट्यानी किती रक्कम लुटली आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.ए टी एम मशीन लुटण्यास आलेल्या चोरट्यानी सी सी टी व्ही कॅमेरावर स्प्रे सोडून बंद पाडवला.
नंतर ए टी एम गॅस कटर वापरून फोडून रक्कम लांबवली. बँक अधिकाऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारब्यांग यांनी देखील भेट देऊन पाहणी करून तपासाच्या दृष्टीने पोलिसांना सूचना केल्या. चोरट्याना पकडण्यासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती पोलीस आयुक्तानी दिली आहे.