बेळगांव:पुणे बंगलोर महामार्गाला लागून असलेल्या काकती येथील एका ए टी एम ला अचानक आग लागून ए टी एम आगीत भस्मसात झाले. पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या ए टी एम मधून धूर येत असल्याचे पेट्रोल पंपावरील कामगाराच्या लक्षात आले. त्याने लगेच आग लागल्याचे पाहून आरडा ओरड करून सगळ्यांना सांगितले. तोपर्यंत ए टी एम मधून आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या होत्या. अग्निशमन दलाला देखील कळवण्यासाठी फोन करण्यात आला पण फोन कोणीच उचलला नाही.
https://www.instagram.com/reel/DF4e04Ohget/?igsh=MXdpMnQ2dWluYWl3Mg==
त्यामुळे पंपावरील कामगारांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पाणी मारून आग विझवण्यास प्रारंभ केला. त्याचवेळी तेथून निघालेल्या पाण्याच्या टँकर चालकाने तेथे थांबून टँकर मधील पाण्याने आग विझवली. https://dmedia24.com/the-wife-murdered-her-husband/आगीत ए टी एम मशीन आणि केबिन पूर्ण जळून खाक झाली असून काकती पोलीस स्थानकात सदर प्रकरणाची नोंद झाली आहे. पंपावरील कामगार, आजूबाजूचे नागरिक आणि टँकर चालक यांनी प्रसंगावधान राखून आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.